कासोदा बीएसएनएलच्या ऑफीसमधून 30 हजारांचे साहित्य लांबवले
30,000 materials were sent from Kasoda BSNL office कासोदा : कासोदा गावातील बीएसएनएल कार्यालयातून चोरट्यांनी सुमारे 30 हजारांचे साहित्य लांबवले. याप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनिष्ठ दुरसंचार अधिकारी योगेश कासार यांच्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी 28 रोजी रात्री 12.52 ते 28 च्या दुपारी अडीच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातून पॉवर प्लेट, कम्युनिटी कॉपर प्लेट, वायरी मिळून 29 हजार 400 रुपये किंमतीच्या विविध साहित्याची चोरी केली. कासोदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक सहदेव घुले करत आहेत.


