कंडारीत धाडसी घरफोडी : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास
नशिराबाद : नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील कंडारी येथे घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख रक्कम मिळून दोन लाख 70 हजार 625 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
जळगाव तालुक्यातील कंडारी येथील किराणा दुकानदार महेंद्र माधव परदेशी (45) हे कंडारीत कुटूंबासह वास्तव्यास आहे. 17 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत परदेशी कुटूंब बाहेरगावी असल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडत घरात प्रवेश केला. कपाटातील तिजोरीतील दिड लाखांची रोकड, चार गॅ्रमचे टोंगल, 11 हजार 250 रुपये किंमतीची सोन्याची पोत, 75 हजार रुपये किंमतीची सोन्याचे पट्टी पोत, 13 हजार 125 रुपये किंमतीचे कानातील चाफे, सहा हजार 250 रुपयांचे देव घरातील चांदीचे देव असा एकूण दोन लाख 70 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहेत.


