राज्यात गाजलेल्या जळगावातील घरकुल घोटाळ्यातील चौघे तत्कालीन नगरसेवक अपात्र


The four former corporators in the Gharkul scam in Jalgaon, which became famous in the state, were disqualified जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकूल घोटाळ्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघा तत्कालीन नगरसेवकांना अपात्र करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंता महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी याबाबत आदेश पारीत केले आहेत.

घोटाळ्याप्रकरणी झाली होती शिक्षा
तत्कालीन नगरपालिकेतील घरकूल घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजला होता. यात माजी आमदार, नगराध्यक्षांसह 43 आजी-माजी नगरसेवकांना धुळे विशेष सत्र न्यावालयाने 31 ऑगस्ट 2019 रोजी दोषी ठरवले होते. तर याच प्रकरणात सुरेशदादा जैन आणि इतरांना कारागृहात जावे लागले होते. ही शिक्षा सुनावण्याच्या आधीच म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सावीत्रिक निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवून भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भोईटे विजयी झाले होते तसेच कैलास सोनवणे यांना स्वीकृत नगरसेवक नियुक्त करण्यात आले होते.


न्यायालयात दाखल होता खटला
घरकुल घोटाळ्यात न्यायाल्याने शिक्षा ठोठावल्याने चारही नगरसेवकांना अपात्र करावे यासाठी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. यात न्यायालयाने या चौघांना अपात्र करण्याचे निर्देश दिले होते. या निकालानंतर संबंधीतांना अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या अनुषंगाने महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी कैलास सोनवणे, भगत बालाणी, सदाशीव ढेकळे आणि लताताई भोईटे या चौघांना सहा वर्षांसाठी अपात्र केले आहे. ही अपात्रता ऑगस्ट 2019 पासून धरली जाणार आहे. यामुळे अर्थातच ऑगस्ट 2025 पर्यंत हे चौघे जण निवडणूक लढवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. याआधी महापालिकेची निवडणूक झाल्यास त्यांना घरातील दुसर्‍या सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !