अल्पवयीन तरुणाचा व्हिडिओ व्हायरलची धमकी देत मागितली खंडणी : चौघांविरोधात गुन्हा
पाचोरा : पाचोरा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलाला बळजबरीने संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडून या घटनेचा अश्लील व्हिडिओ चित्रीत करण्यात आला व नंतर त्या आधारे वेळोवेळी पैसे उकळण्यात आले व व्हिडिओ व्हायरलची धमकी देखत पिडीतेच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील एका गावातील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बळजबरीने संबंधानंतर काढला व्हिडिओ
जळगाव जिल्ह्यातील 17 वर्ष व सात महिने वयाचीा पीडीत पाचोरा तालुक्यातील एका गावात असताना तिथे त्याच्याशी महिलेने एकासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले व त्या घटनेचा व्हिडिओ तयार केला. त्यानंतर या व्हिडिओद्वारे पैशांची मागणी करून पैसे उकळण्यात आले व पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. या प्रकाराबाबत पीडीतेच्या वडीलांनी संबंधीत तरुणाला विचारणा केली असता त्याच्यासह इतर दोघांनी त्यांना वाद घालून मारहाण व शिवीगाळ केली. या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.


