जामनेर तालुक्यातील 40 वर्षीय महिलेवर अत्याचार
A 40-year-old woman was assaulted in Jamner taluka जामनेर : शेताजवळील नाल्यात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या 40 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीतेच्या तक्रारीवरून गुन्हा
जामनेर तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गुरूवार, 7 डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता महिला शेताजवळील नाल्यात जमा करत असतांना संशयित विष्णू पुनमचंद राठोड याने महिलेचे तोंड दाबून नाल्यातच अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडीतेने पहूर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहे


