अमळनेरात दोन दिवसीय पुरूष जातीचे मृत अर्भक आढळले


A two-day-old male infant was found dead in Amalner अमळनेर : अवघ्या दोन दिवसीय नवजात जातीचे मृत अर्भक शहरात आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्मल्याचा संशय असून अज्ञाताविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अनोळखीविरोधात गुन्हा
अमळनेर ते चोपडा रोडवरील बोरी नदीच्या फरशीपुलाच्या खाली एक अर्भक मयतस्थितीत आढळून आल्याने अमळनेरचे हवालदार संजय पाटील आणि घनश्याम पवार या पालिसस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. यावेळी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हे अर्भक कुणाचे आहे याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत पोलिसांनी चौकशीला कसुन सुरूवात केली आहे. पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. हवालदार संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !