शेती हिस्से वाटणीचा वाद उफाळला : शेंदुर्णीत पित्याची हत्या


Argument over the distribution of farm shares erupted: Father’s murder in Shendurni शेंदुर्णी : शेती वादातून पित्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शेंदुर्णीत खळबळ उडाली. नाना बडगुजर (82) असे मयताचे तर कैलास नाना बडगुजर (56) असे संशयिताचे नाव आहे

डोक्यात फावडा मारताच पित्याचा मृत्यू
शेतकरी नाना बडगुजर हे शनिवारी सकाळच्या सुमारास शेतात कपाशी वेचत असताना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा कैलास नाना बडगुजर शेतात आला व वडीलांसोबत वाटणी वरून वाद घालू लागला. शाब्दीक वाद वाढत गेल्यानंतर आरोपी कैलासने वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात भुसा भरण्याच्या फावडयाने डोक्यात जोरात वार करताच नाना बडगुजर यांचा जागीच मृत्यू झाला.



आरोपी पसार : आरोपीचा मुलगाच फिर्यादी
घटना घडली तेव्हा आरोपीचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी शेतात काम करीत होते. विशालने वडिलांनी आजोबाच्या डोक्यात वार केल्याचे बघताच धाव घेतली. त्याने वडीलांच्या हातुन फावडे हिसकावून जखमी आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला मात्रते हालचाल करीत नसल्याचे पाहून आरोपी पसार झाला. आरोपीचा मुलगा विशाल कैलास बडगुजर (33) याने वडिल तथा संशयित कैलास बडगुजर यांच्या विरोधात तक्रार दिल्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पोलिस निरीक्षक संदीप सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !