धरणगाव तालुक्यताील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


A minor girl from Dharangaon taluk was lured and abducted धरणगाव : धरणगाव तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
धरणगाव तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 9 डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेली. नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु अल्पवयीन मुलीबाबत काहीही माहिती मिळाली नाही. धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गजानन महाजन करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !