धरणगावातील रेल्वे पुलावर भरधाव ट्रक बसवर धडकली : प्रवासी जखमी
Speeding truck hits bus on railway bridge in Dharangaon : passenger injured धरणगाव : मद्याच्या नशेत असलेल्या ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवल्यानंतर रेल्वे उड्डाणपुलावर बसला धडक दिली. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले. हा अपघात रविवारी, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रात्री साडे अकरा वाजता ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रक चालकाविरोधात गुन्हा
धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर ट्रक क्रमांक (एम.एच.18 बी.जी.1175) वरील चालक जब्बार शेख लुकमान शेख (रा.सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) याने दारूच्या नशेत ट्रक चालवला तसेच समोरून येणार्या बस (एम.एच.20 बी.एल.3556) ला जोरदार धडक दिल्याने बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवार, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला. जखमी प्रवाशांवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. बस चालक गोपाल मगन पाटील (45, रा.सतखेडा, ता.धरणगाव) यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक जब्बार शेख लुकमान शेख (सेंधवा, जि.बडवाणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश पाटील हे करीत आहे.


