जळगावातील तरुणावर प्राणघातक हल्ला


Assault on youth in Jalgaon जळगाव : शहरातील समता नगरात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच जळगाव शहरातील जैनाबादमध्ये देखील एका तरुणाच्या डोक्यात दगड टाकून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली. ही घटना रविवार, 10 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी या प्रकारानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. डिगंबर दिनकर सैंदाणे (25, रा. जैनाबाद, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

अज्ञातांनी केला हल्ला
जैनाबाद परीसरातील डिगंबर सैंदाणे हा तरुण नाश्त्याची हातगाडी लावून उदरनिर्वाह करतो. रविवारी संध्याकाळी त्याने हातगाडी बंद केली व जेवणासाठी मासे घ्यायला जैनाबाद परीसर गाठला. तेथे अज्ञात तरुणांशी त्याचा कुठल्यातरी कारणावरून वाद झाला व त्यानंतर अज्ञात तरुणांनी त्याच्या डोक्यात दगड घातल्याची माहिती आहे. या प्राणघातक हल्ल्यात तरुणाच्या डाव्या डोळ्याला व हनुवटीलादेखील मार लागला आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी व त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याचेवर वैद्यकीय अधिकार्‍यांनी उपचार सुरू आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !