चाळीसगावातील विवाहितेचे बसस्थानकातून 45 हजार लांबवले


45,000 from the bus station of a married woman in Chalisgaon भडगाव : चाळीसगाव शहरातील विवाहिता भडगाव बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असताना अज्ञात 50 ते 55 वर्षीय महिलेने लबाडीने महिलेच्या पर्समधील 45 हजारांची रोकड लांबवली. ही घटना सोमवार, 11 रोजी दुपारी 12.20 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ज्योती पंढरीनाथ निकम (43, शाहुनगर, चाळीसगाव) या महिलेच्या तक्रारीनुसार, त्या भडगाव बसस्थानकात सोमवारी दुपारी उभ्या असताना 50 ते 55 वर्षीय महिलेने 45 हजारांची रोकड असलेली पर्स लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी भडगाव पोलिसात तक्रार नोंदवली. तपास हवालदार विजय जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !