यावल शहरात अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
Minor girl student molested in Yaval city यावल : यावल शहरातील एका शाळेच्या गेटजवळ शाळकरी विद्यार्थिनीचा रस्ता अडवत माझ्याशी प्रेम कर, असे म्हणत विनयभंग करण्यात आला शिवाय या प्रकरणाबाबत चुलत भावाने जाब विचारल्याने त्रिकूटाने फायटरने मारहाण केली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शाळेच्या गेटजवळच केला विनयभंग
यावल शहरातील एका भागातील अल्पवयीन 15 वर्षी विद्यार्थिनी ही बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास एका विद्यालयात शिक्षणासाठी जात असतांना विद्यालयाच्या गेटसमोर दुचाकी आडवी लावून एका संशयिताने अल्पवयीन मुलीला तु माझ्याशी प्रेम कर, असे म्हणत तिचा विनयभंग केला.


यावेळी अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ या ठिकाणी आला व त्या तरुणास माझ्या बहिणीचे नाव का घेतले? असे विचारल्यानेर संशयितानी फायटरने मारहाण केली. अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तिन तरुणांविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास सहाय्यक निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.
