युपीतील तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्दैवी मृत्यू


UP youth tragically dies after falling from running train जळगाव : युपीकडे कुठल्यातरी रेल्वेने निघालेल्या तरुणाचा रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. विशाल राजेशकुमार यादव (21, रा.सिध्दार्थ नगर, उत्तरप्रदेश) असे मयत तरुणाचे नाव आहे. मुंबईहून उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी विशाल हा तरुण रेल्वेने निघाला होता मात्र त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जळगाव ते भादली अप रेल्वेलाईनवर घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तोल जावून पडल्याने मृत्यू
उत्तरप्रदेशातील सिध्दार्थ नगरातील तरूण विशाल यादव हा तरूण नोकरीनिमित्त गेल्या चार वर्षापासून मुंबईला वास्तव्याला होता. मंगळवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी विशाल यादव हा उत्तरप्रदेश येथे गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत होता. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रेल्वेही जळगाव ते भादली दरम्यान धावत असतांना अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक 428 जवळ त्याचा तोल जावून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्टेशन मास्तर यांनी घटनेची माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. आधार कार्डच्या आधारे मयत तरुणाची ओळख पटली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार अतुल महाजन हे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !