चोरटे शिरजोर : जळगावात वृध्दाच्या पिशवीतून 60 हजार लांबवले


Thieves on the move: 60,000 stolen from an old man’s bag in Jalgaon जळगाव : रस्त्याने पायी चालणार्‍या वृद्धाच्या पिशवीतून चोरट्यांनी 60 हजारांची रोकड तसेच बँकेचे चेकबुक व पासबूक लांबवले. जळगाव शहरातील दाणा बाजारामधील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौकादरम्यान ही घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी सायंकाळी जळगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संधी साधून केली चोरी
जहर अली वजीर अली सय्यद (80, रा.सालार नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार , 14 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील फुले मार्केट येथे कामाच्या निमित्ताने आले असता त्यांच्या पिशवीत 60 हजार रुपयांची रोकड, बँकेचे चेकबुक व पासबुक ठेवले होते. दाणा बाजारातील परसराम पोल्ट्री सेंटर ते सुभाष चौक दरम्यान पायी जात असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील 60 हजारांची रोकड, पेन्शनचे पुस्तक, बँकेचे चेक बुक आणि पासबुक असा मुद्देमाल चोरून नेला.



अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
जहूर अली यांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायंकाळी सात वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !