गिरणापात्रात बुडालेला तरुण बामणोद गावातील रहिवासी


A young resident of Bamanod village who drowned in the waterfall जळगाव  : जळगाव तालुक्यातील नागझिरा शिवारातील गिरणा नदीपात्रात गुरुवार, 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत पोलिसात याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी मयताची ओळख पटली असून मयत तरुण गणेश सीताराम पाटील (35, रा. बामणोद, ता.यावल) असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसात जाताच पटली ओळख
गणेश हा बामणोद गावात आई लीलाबाई, मोठा भाऊ संदीप, वहिनी, पुतण्यांसह राहत होता. जळगावात वडनगरी येथील मागील आठवड्यात झालेल्या प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेत गुरुवार, 7 डिसेंबर रोजी आईसोबत गणेश हादेखील गेला होता. दरम्यान, कथा संपल्यावर 11 रोजी आई लीलाबाई यांना मुलगा गणेश दिसून आला नाही. त्यांनी शोधाशोध केली मात्र मुलगा न मिळाल्याने लीलाबाई घरी बामणोद येथे परत आल्या. गणेशच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण तो मिळत नव्हता. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नागझिरा शिवारात गिरणा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह मिळाला. तो त्यांनी शासकीय रुग्णालयात पाठविला. त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, गणेशच्या कुटुंबीयांनी शुक्रवार, 15 रोजी सायंकाळी 5 वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी नदीपात्रात बुडालेल्या व्यक्तीचा फोटो दाखविला तसेच शासकीय रुग्णालयातील मृतदेह दाखविला तेव्हा गणेश पाटीलची ओळख पटली. हवालदार अनिल फेगडे, संजय भालेराव, अनिल मोरे यांनी या कामी सहकार्य केले. तपास हवालदार लिलाधर महाजन करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !