जळगावात हद्दपार आरोपींची सुर्याच्या धाकावर दहशत : दोघांना बेड्या
एमआयडीसी पोलिसांची कारवाई ः गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
Deported accused in Jalgaon terrorized by Surya : Both are shackled जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दोघांना हद्दपार करण्यात आल्यानंतरही आदेशाचे उल्लंघण करीत संशयित लोखंडी सुरा बाळगून दहशत निर्माण करीत असल्याने एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकुर (20, डी.एन.सी.कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव) व निशांत प्रताप चौधरी (20, डी.एन.सी. कॉलेज जवळ, शंकरराव नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ठाकूर व चौरी यांना 19 ऑक्टोबर 2023 रोजी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. हद्दपार संशयित जळगाव शहरात येवून दहशत निर्माण करीत असल्याची एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी निशांत प्रताप चौधरी यास तुकारामवाडी येथून लोखंडी सुर्यासह ताब्यात घेण्यात आले तर रविवारी सायंकाळी 07.15 वाजता स्वप्नील उर्फ गोलु धर्मराज ठाकूर यास जळगाव शहरातील पांडे चौकाजवळील रामदेव बाबा मंदिराजवळून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळही लोखंडी सुरा जप्त करण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, मुकेश पाटील, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील आदींच्या पथकाने केली.
