जळगाव शहरातील मयूर ट्रेडर्समधून 50 हजारांची रोकड लंपास


जळगाव : जळगाव शहरातील विसंगती नगरातील मयुर ट्रेडर्समधून चोरट्यांनी गल्ला फोडून सुमारे 50 हजारांची रोकड लंपास केली. सोमवार, 18 रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

मयुर पुरुषोत्तम मंडोरे (38) हे किराणा दुकान व्यावसायिक असून ते गणपतीनगरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीचे मयुर ट्रेडर्स आहे. या दुकानातून चोरट्यांनी रोकड लंपास केली. याप्रकरणी तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !