जामनेर तालुक्यात दिड लाखांचा रेशनचा तांदूळ जप्त : दोघांविरोधात गुन्हा


Ration rice worth half a lakh seized in Jamner taluka : Crime against two जामनेर : जामनेर तालुक्यातील नेरीदीगर येथे तब्बल एक लाख 60 हजारांचा रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.जामनेर तहसीलदार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीद्वारे ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला. पथकाने अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला एक लाख साठ हजार रुपयांचा 118 गोण्या रेशनचा तांदूळ जप्त केला. तांदळासह वाहन (बोलोरो पिकअप) जप्त करण्यात आले आहे.

गोपनीय माहितीवरून काररवाई
जामनेर तालुक्यातील तहसीलदार नानासाहेब आगळे यांना बुधवार, 20 रोजी रेशनच्या तांदळबाबत गुप्त माहिती मिळाली होती. रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असताना त्यांनी तलाठी नितीन मनोरे, अजय गवते, चेतन ताथे, अभिलाष ठाकरे, प्रमोद इंगळे, राजेश देवले, गोदाम व्यवस्थापक अशोक सोनवणे यांना तात्काळ बोलवून त्यांना माहिती देऊन गोडाऊनवर छापा टाकण्याचे सांगितले. दोन खाजगी वाहनाने दोन पथके जामनेर तालुक्यातील निरीदिगर येथे पोहोचले. त्या ठिकाणी जळगाव रोड लगत भोळे नगर परिसरात कांतीलाल राखबचंद जैन यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये रेशन दुकानात तांदूळ साठवलेला मिळून आला. तो काळ्या बाजारात विक्रीसाठी पिकअप व्हॅन मध्ये भरण्यात येत होता. त्यावेळी तलाठी यांनी तो सर्व तांदूळ जप्त केला. रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पोलिसांनी ही कारवाई केली.



118 तांदुळाच्या गोण्या जप्त
या छाप्यामध्ये 118 तांदुळाच्या गोण्या मिळून आल्या. त्याचबरोबर दोन लाख रुपयांची बोलोरो पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक विवेक वैराळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांतीलाल जैन व सुकलाल नेमाडे पिकअप चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !