अमळनेर तालुक्यातील 29 वर्षीय प्राध्यापक तरुणीवर लग्नाच्या आमिषााने अत्याचार
A 29-year-old female professor in Amalner taluka was raped with the lure of marriage अमळनेर : लग्न करण्याच्या आमिषाने अमळनेर तालुक्यातील 29 वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला व नंतर तरुणाने तरुणीस लग्नास नकार दिल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. ही घटना 18 ते 20 डिसेंबरदरम्यान घडली. संशयित सचिन नाना पाटील (28, ह.मु.धडगाव, ता.नंदुरबार) याच्याविरोधात अमळनेर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्न करण्याच्या आमिषाने वारंवार केला अत्याचार
अमळनेर तालुक्यातील एका गावात 29 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती व्यवसायाने प्राध्यापक आहे. दोन वर्षांपासून तरुणी व तरुणात प्रेमसंबंध निर्माण झाले व तरुणीला भेटण्यासाठी धडगाव येथून अधून-मधून तरुण अमळनेरात येत होता. फिर्यादीचा 17 डिसेंबरला वाढदिवस असल्याने पळून जावून लग्न करू, असे आमिष तरुणाने देत तरुणीला धडगाव येथे फिर्यादीच्या खोलीवर नेले. तेथे वेळोवेळी शारीरीक संबंध निर्माण केले व अचानक घरच्यांनी लग्नास नकार दिला आहे, असे सांगितल्याने फिर्यादीला धक्का बसला. त्यानंतर संशयित आरोपीने फिर्यादीस ठार मारण्याची धमकीही दिली. तळोदा रोडवरील एका हॉटेलजवळ तरुणीला सोडून संशयित पसार झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.


