जळगावात चोरटे शिरजोर : डॉक्टरांच्या घरातून 32 हजारांचा मुद्देमाल लांबवला
जळगाव : डॉक्टराच्या बंद घरातून चोरट्यांनी एलईडी, चायनिज पैसे, चांदीचे नाणे, घड्याळ असा सुमारे 32 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. पिंप्राळा शिवारात गुजराल पेट्रोलपंपासमोर मंगळवार, 19 रोजी घटना घडली.
बंद घरे चोरट्यांना पर्वझी
डॉ.मंदार बाळासाहेब पंडीत (36) यांचा या ठिकाणी निवास आहे. मंगळवारी ते घर बंद करुन कामानिमित्त बाहेर गेले होते. ही संधी साधत 8 ते 9 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी घराला लक्ष्य केले. लाकडी दरवाजाचे कुलुप तोडत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.त्यानंतर मुद्देमालाचा शोध घेतला. चोरट्यांनी 15 हजार किंमतीचा एलईडी, पाच हजार मूल्याचे चायनिज पैसे, चार हजार किंमतीचे 15 नग चांदीचे नाणे, एक हजार किमतीचे चांदीचे देव, 7 हजार किंमतीचे हात घड्याळ लांबवण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांनी घटनास्थळी पाहणी करुन घटनेची माहिती घेतली. तपास हवालदार जितेंद्र राजपूत करीत आहेत.


