जळगावातील तरुणीला व्हिडीओ पाठवत व्हायरलची धमकी : एकाविरोधात गुन्हा


A young girl in Jalgaon was threatened by making a fake video and went viral : a crime against one जळगाव : व्देष भावनेने बनावट व्हिडिओ तयार करीत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. शहरातील एका तरुणीचा घरात कपडे बदलण्याचा व्हिडीओ तरुणीला पाठवून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी संशयितांविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा
21 वर्षीय तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते. ती कुटुंबासह शहरात वास्तव्यास आहे. मंगळवार, 19 ते बुधवार, 20 दरम्यान रोहीत पुढे पाच आकडे या इस्टाग्राम खाते धारकाने पिडितेच्या इस्टाग्राम खातेवर अश्लील भाषेत मेसेज पाठविला. पिडिता घरात कपडे बदलवितानाचा व्हिडीओ पाठविला. तो सोशल मिडियावर व्हायरल करेल, अशी धमकीही त्याने दिली. भयभीत तरुणीने हा प्रकार कुटुंबात सांगितला. त्यानंतर बुधवार, 20 रोजी तिने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !