शेती कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहाच्या धक्क्याने अडावदच्या तरुणाचा मृत्यू
Youth of Adavad dies after electrocution left in farm fence यावल : शहरातील एका शेतकर्याने बटाईने दिलेल्या शेतात जनावरांपासून आपल्या शेत-पिकाचे संरक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणार्या झटका मशीनचे तारांनी कुंपन केले आहे. या ताराच्या कुंपणाचा शॉक लागून विशाल रमेश मेढे (34, रा.अडावद, ता.चोपडा) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विजेचा झटका बसताच तरुणाचा मृत्यू
यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांचे शेत गट क्रमांक 724/2 हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोळी (संभाजी पेठ, यावल) यांनी बटाईने केले आहे. या शेतात शेती-पिकाचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी कोळी यांनी बॅटरीवर चालणारे झटका मशीनचे तारेचे कंम्पाऊंड केले आहे शेताच्या सभोवताली लावलेल्या या तारांच्या कुंपनावर शुक्रवारी विशाल रमेश मेढे (34, रा.अडावदफ, ता.चोपडा) हा तरुण मृत स्थितीत आढळून आला.


याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी सचिन कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तडवी करीत आहे.
