जळगावातील आहुजानगर स्टॉपजवळून पोकलॅण्डचे पार्ट लांबवले
Part of Pokland extended near Ahujanagar stop in Jalgaon जळगाव : आहुजानगर स्टॉपजवळ सार्वजनिक मोकळ्या जागेवर ठेवलेले पोकलॅन्ड मशीनचे पार्ट चोरट्यांनी लांबविले. बुधवार, 20 रोजी याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
चोर्या वाढल्या
तुषार दिलीप मोरे (34) हे मॅकेनिकल असून आहुजानगरात वास्तव्यास आहेत. आहुजानगर स्टॉपजवळ ते दुरुस्तीचे काम करतात. याठिकाणी त्यांनी 40 किलो वजनाचा सुमारे 30 हजार किंमतीचा पोकलॅन्ड मशीनचा गोलाकार पार्ट, 40 हजार किंमतीचे पोकलॅन्ड मशीनचे 50 किलो वजनाचे गोलाकार स्विंग डिव्हाईस पार्ट ठेवला होता. हे दोघे वजनदार पार्ट चोरट्यांनी लंपास केले. सुमारे 70 हजारांचा मुद्देमाल चोरीची ही घटना शुक्रवार, 15 ते मंगळवार, 19 दरम्यान घडली. तुषार मोरे यांनी याप्रकरणी बुधवार, 20 रोजी पोलिसात तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास हवालदार अनिल फेगडे करत आहेत.


