जळगावात किरकोळ वादातून एकावर चाकूहल्ला
In Jalgaon, a person was stabbed due to a minor dispute जळगाव : शहरातील आंबेडकर नगर परीसरात तरुणाने दुचाकीवर बसू न दिल्याच्या रागातून शिवीगाळ करत चाकूने वार करण्यात आला. ही घटना बुधवार, 20 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता शनिपेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
किरकोळ वादातून हल्ला
महेंद्र उर्फ मनोज नवल राठोड (27, रा.आंबेडकर नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार, 20 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता महेंद्र राठोड हा त्याच्या दुचाकीने जळगाव शहरातील आंबेडकर नगर परिसरातून जात होता. त्यावेळी रस्त्यावर विकी ज्ञानेश्वर पाटील माळी (18, रा.जानकी नगर, जळगाव) याने दुचाकीवर बसू देण्याची मागणी केली. त्यावर दुचाकीस्वार महेंद्र राठोड यांनी दुचाकीवर बसू दिले नाही. याचा राग आल्याने संशयित आरोपी विकी ज्ञानेश्वर माळी याने शिवीगाळ करत चाकूने वार दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर शुक्रवार, 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता शनिपेठ पोलिसात संशयित आरोपी विकी माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक योगेश जाधव हे करीत आहे.


