जामनेर तालुक्यातील तरुणीवर बलात्कार : बेकायदा गर्भपात करणार्या डॉक्टरांसह चौघांविरोधात गुन्हा
Rape of young woman in Jamner taluk: Case against four including doctor for illegal abortion जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणी कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला व ही बाब कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली व त्यातून पीडीता गर्भवती राहिली. पीडीता गर्भवती राहिल्याबाबतची माहिती लपवून ठेवत बेकायदा गर्भपातही करण्यात आल्यानंतर अत्याचार करणार्या नराधमासह बेकायदा गर्भपात करणार्या डॉक्टरांविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय तरुणी कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर तिच्या एकांताचा फायदा घेत शेनफडू रामदास सोनवणे (जामनेर तालुका) याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला शिवाय ही घटना कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा अत्याचार करण्यात आला. ही घटना 23 डिसेंबर 2023 च्या सहा महिन्यांपूर्वी घडली. अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिल्यानंतर पीडीतेने ही बाब आईसह भावाला सांगितली मात्र त्यांनीदेखील समाजात बदनामी होईल या भीतीने जामनेर तालुक्यातील एका महिला डॉक्टरांच्या रुग्णालयात पीडीतेचा बेकायदा गर्भपात करून घेतला.


याप्रकरणी जामनेर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय पंढरीनाथ सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार शेनफडू सोनवणे, पीडीतेची आई, भाऊ तसेच बेकायदा गर्भपात करणार्या महिला डॉक्टरांविरोधात पहूर पोसिात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय बनसोड करत आहेत.
