अल्पवयीन पीडीतेने विवाहानंतर दिला मुलीला जन्म : पतीसह पाच संशयितांविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा
A juvenile convict gives birth to a girl after marriage : A case has been registered in MIDC police against five suspects including her husband जळगाव : अल्पवयीन तरुणीचा विवाह लावून दिल्यानंतर पीडीतेने मुलीला जन्म दिला. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरून पीडीतेच्या पतीसह सासु, सासरे व आई-वडिलांविरोधात जळगाव एमआयडीसी नोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन मुलीचा केला विवाह
जळगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीचा विवाह करून देण्यात आल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व तिने मुलीला जन्म दिला. पीडीतेच्या प्रसुतीदरम्यान ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुण्यातील चतुःसिंगी पोलिसात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व हा गुन्हा एमआयडीसी पोलिसात वर्ग करण्यात आला. आरोपी पती शुभम राजपूत, सासरे कैलास राजपूत, सासू वनिता राजपूत, आई रेखा दणाने व वडिल शंकर दुणाने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक दयानंद सरवडे करीत आहेत.


