भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील चौघांवर स्थानबद्धतेची कारवाई : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
Placement action against four in Bhusawal and Jalgaon district: Excitement in criminal circles भुसावळ : भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार योगेश देविदास तायडे (33) याच्यासह जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर येथील अन्य तिघांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी जिल्हाधिकार्यांनी पारीत करीत गुरुवारी संशयितांना ताब्यात घेत संबंधित कारागृहात हलवण्यात आले.
योगेश तायडेविरोधात गंभीर गुन्हे
योगेश तायडेविरोधात मारहाण करून जबरी चोरी करणे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, रेती चोरी तसेच शासकीय कर्तव्यात अडथळा करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे केल्यानंतर संशयित जामीनावर सुटताच पुन्हा गुन्हे करीत असल्याने बाजारपेठ पोलिसांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता.


योगेश तायडेची नागपूरात रवानगी
जिल्हाधिकार्यांनी योगेश देविदास तायडे विरोधात आदेश पारीत केल्यानंतर पोलिस अधीक्षक एम.राजकुमार जळगाव, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनरावज नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, आत्माराम भालेराव, निलेश चौधरी, रमन सुरळकर, यासीन पिजांरी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल वानखेडे, योगेश महाजन तसेच गुन्हे शाखेचे सुनील दामोदरे, ईश्वर पाटील आदींनी संशयिताची नागपूर कारागृहात गुरुवारी रात्री रवानगी केली.
