जळगावातील तरुणीची सोशल मिडियावरुन बदनामी : अनोळखीविरोधात गुन्हा
Defamation of college girl in Jalgaon on social media : Crime against stranger
जळगाव : जळगावातील 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा फोटो मिळवत या फोटोत छेडछाड करीत बनावट इंस्टाग्राम खात्यावर टाकून तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात जळगाव सायबर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनोळखीचा कसून शोध
20 वर्षीय पीडीता महाविद्यालयीन तरुणी असून एका जिल्ह्यातून ती शिक्षणासाठी जळगावात आली आहे. या तरुणीच्या फोटोसोबत छेडछाड करीत तरुणीच्या परीचीताशी अश्लील चॅटींग करून पीडीतेची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी इंस्टाग्राम बनावट अकाऊंटधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.


