जळगावात महसूल कर्मचार्‍याला धक्का देत वाळूचे डंपर पळविले


In Jalgaon, a sand dumper ran away, pushing a revenue employee जळगाव : वाळूची चोरटी वाहतूक होत असताना महसूल कर्मचार्‍यांनी डंपर रोखले मात्र कारवाई करत असताना महसूल कर्मचार्‍याला धक्का देत चालकाने वाळूचे डंपर पळवून नेले. आकाशवाणी चौक ते ईच्छादेवी पोलीस चौकीसमोर मंगळवार, 26 रोजी मध्यरात्री घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली.

वाळू माफियांची दादागिरी थांबेना
डंपर (एम.एच.12 डी.जी.7257) मध्ये गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू भरण्यात आल्यानंतर या डंपरला कर्मचार्‍यांनी रोखले. चौकशीत चालकाकडे वाळूचा परवाना नसल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी डंपर सोबत चारचाकी (एम.एच.18 बी.सी.0804) या क्रमांकाच्या अल्टोमधून चालक येथे थांबला. यावेळी यासंदर्भात शासकीय कामकाज सुरू असताना संशयितांनी कर्मचार्‍याला धक्का दिला. त्यानंतर डंपर व अल्टो हे वाहने संशयितांनी नेली. याप्रकरणी शासकीय कर्मचारी मनोज कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन डंपर चालक तसेच अल्टो चालक यांच्या विरुध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !