जळगावच्या मेहरुण तलावात चौघे बुडाले ; तिघांना वाचवण्यात यश : एकाचा मृत्यू


Four drowned in Jalgaon’s Mehrun Lake ; Successfully rescued three : one died जळगाव : जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेले शाहू नगरातील चार मुले बुडाले मात्र तीन जणांना वाचविण्यात यश आले तर ईशान शेख वसीम (13, रा.शाहू नगर, जळगाव) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परीसरात घडली.

पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
जळगावच्या शाहू नगर परिसरातील ईशान शेख वसीम, मोईन खान अमीन खान (13), अयान तस्लीम भिस्ती (13) व असलम शेख सलाउद्दीन (13, रा.शाहूनगर, जळगाव) हे चौघे शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने चोघे बुडू लागले व हा प्रकार पाहून पोहणार्‍यांनी तातडीने धाव घेत तिघांना वाचवण्यात यश आले मात्र ईशान शेख वसीम या मुलाचा बुडून मृत्यू झाला.



काही वेळाने ईशान शेख वसीम या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मृताच्या आप्तांनी अपघातस्थळी प्रचंड आक्रोश केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !