दोन गावठी कट्टे व 15 जिवंत काडतूसांसह अट्टल गुन्हेगार जळगाव एलसीबीच्या जाळ्यात


A staunch criminal with two Gavathi kattes and 15 live cartridges in the net of Jalgaon LCB जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन गावठी कट्टे व 15 जिवंत काडतूसांसह अट्टल गुन्हेगाराला शनीपेठ हद्दीतून बेड्या ठोकल्या आहेत. नमीर आसीफ खान (19, रा.काट्या फाईल जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव एसीबीला नमीर खानबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी संशयित येताच त्यास अटक करण्यात आली. ासंशयिताकडून दोन कट्टे व 15 काडतुस जप्त करण्यात आले व त्यास शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, किरण चौधरी, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !