जळगावात तोतया पोलिसांनी वयोवृद्धेच्या 50 हजारांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या
In Jalgaon, Totaya Police confiscated gold bangles worth 50,000 from an elderly woman जळगाव : पोलिस असल्याचे भासवून वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवत भामट्यांनी वयोवृद्धेच्या हातातील 50 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबवल्या. हा प्रकार आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट या भागात शुक्रवार, 29 रोजी दुपारी 12.30 वाजता घडला. याप्रकरणी अनोळखी दोघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस असल्याचे सांगून केली फसवणूक
पुष्पाबाई लालचंद बखतवाणी (75, गणेश नगर, चिनार अपार्टमेंट, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता आकाशवाणी ते गोधवाडीवाला अपार्टमेंट दरम्यान दोन अनोळखी इसम आले व त्याने वयोवृद्धेला बोलण्यात गुंतवत हातातील सोन्याच्या बांगड्या काढण्यास सांगत हातचलाखीने त्यांच्याकडील दोन सोन्याच्या बांगड्या वृद्धेकडे देत धूम ठोकली. काही वेळेने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वयोवृद्धेने पोलिसात धाव घेतली. तपास महिला हवालदार वंदना राठोड करीत आहेत.


