चिंचपुर्‍यात धाडसी घरफोडी : 40 हजारांच्या ऐवजावर डल्ला


धरणगाव  : धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा येथे घरफोडी करीत अज्ञात चोरट्याने रोकड, सोन्याचे दागिने मिळून 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीमुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ
नीळकंठ विश्वनाथ कोळी (30) हे आपल्या परिवारासह चिंचपुरा येथे वास्तव्यास आहेत. 30 डिसेंबर रोजी रात्री 9 ते 31 डिसेंबरच्या पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान, श्री. कोळी यांच्या नव्या घराच्या मागील दरवाजाचा कडी- कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील 25 हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण असा 39 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय चौधरी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !