जळगावात गुप्तीच्या धाकावर दहशत : संशयित शहर पोलिसांच्या जाळ्यात
Panic in Jalgaon on Gupti’s Dhak : Suspect in city police net जळगाव : लोखंडी गुप्ती बाळगून दहशत माजविणार्या तरुणाला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेत आहे. ही कारवाई सोमवार, 1 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केली. संशयिताकडून लोखंडी गुप्ती जप्त करण्यात आली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर प्रशांत पाटील (21, इदगाव, ता.जि.जळगाव) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सोमवार, 1 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ कारवाई करत संशयित आरोपी मयूर पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रतन गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर प्रशांत पाटील याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे, पोलिस नाईक किशोर निकुंभ, पोलिस कॉन्स्टेबल तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी केली.
