नाशिक विभागात लाचखोरीत महसूल विभाग ‘अव्वल’ तर पोलिस खाते ‘दुसर्या स्थानी’
सरत्या वर्षात 235 लाचखोरांवर कारवाई : एक अपसंपदेचा गुन्हा
In Nashik Division, Revenue Department ‘Top’ and Police Department ‘Second’ in Bribery नाशिक : ‘शासकीय काम अन बारा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय वारंवार शासकीय कार्यालयात येतो तर लाचेचे वजन ठेवताच चुटकीसरशी फाईल पुढे सरकते ही सर्वसामान्यांची नेहमीच भावना राहिली आहे मात्र शासकीय काम करून देण्यासाठी व घेण्यासाठी लाच मागणार्या लाचखोरांवर अंकुश लावण्याचे काम एसीबीने चोखपणे केले आहे. नाशिक विभागात सरत्या वर्षात एकूण 235 लाचखोर कारवाईच्या जाळ्यात अडकले. 2023 मध्ये महसूल विभाग लाचखोरीत अव्वल राहिला. या विभागात तब्बल 35 सापळे यशस्वी करण्यात आले तर दुसर्या स्थानी पोलिस दलाचा क्रमांक राहिला. या विभागात 30 कारवाया झाल्या. या शिवाय जिल्हा परीषद 15, वीज कंपनी 10, सहकार आठ, पंचायत समिती व भूमी अभिलेख विभागात प्रत्येकी सात सापळे यशस्वी करण्यात आले.
वर्षभरात 235 सापळे यशस्वी
नाशिक एसीबीच्या माहितीनुसार, नाशिक परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांत गेल्या वर्षी एकूण 14 क्लास-1 व 25 क्लास-2च्या अधिकारी विविध कारणास्तव लाचेची मागणी करताना लाचुलचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एकूण 235 लाचखोरांविरूद्ध गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. सर्वाधिक 62 सापळे हे नाशिक जिल्ह्यात लावण्यात आले. महसूल व पोलिस खात्यातील लाचखोरी 2023 सालातही आघाडीवर राहिली.


नाशिकमध्ये 37 गुन्ह्यांची वाढ
एसीबीच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आदेशान्वये पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी एकूण 161 सापळे यशस्वी केेले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत राज्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. यामुळे हे परिक्षेत्र राज्यात अव्वलस्थानावर राहिले. यामध्ये एक अपसंपदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये 2022 च्या तुलनेत 2023 साली लाचखोरीत 37 गुन्ह्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
नाशिक परिक्षेत्रात वर्ग-3चे 126 तर वर्ग-4 मधील14 आणि अन्य लोकसेवक 17 व 39 खासगी व्यक्तींना लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडण्यास पथकांना यश आले आहे. नाशिक परिक्षेत्र सर्वाधिक लाचखोरी व लाखो ते कोटीपर्यंतचे लाचेच्या रकमांमुळे 2023 साली सर्वाधिक चर्चेत राहिले. एकूण सहा गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामध्ये नाशिक, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गुन्ह्यांचा समावेाश आहे.
असे झाले सापळे यशस्वी
नाशिक- 62
अहमदनगर- 34
जळगाव-32
धुळे- 18
नंदुरबार- 15
नाशिक परीक्षेत्रातील विभागनिहाय कारवाया अशा…
महसूल- 35
पोलिस- 30
जिल्हा परीषद- 15
महावितरण- 10
सहकार- 8
पंचायत समिती- 7
भुमी अभिलेख- 7
