दुचाकी अपघातात विटनेरचा तरुण ठार : दुसरा गंभीर जखमी


Vitner youth killed in two-wheeler accident: another seriously injured जळगाव : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर झालेल्या अपघातात विटनेरचा तरुण ठार झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जळगाव तालुक्यातील जळके गावाजवळ लग्नाहून परतताना दुचाकी घसरल्याने हा बुधवारी दुपारी साडेतीन वाजता अपघात घडला. चेतन दीपक वराडे (16, रा. वटनेर, ता.जळगाव) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (20, रा.विटनेर, ता.जळगाव) हा तरुण जखमी झाला आहे.

लग्नाहून परतताना अपघात
जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी असलेला चेतन वराडे हा युवक इयत्ता दहावीला असून तो व पुष्पल गायकवाड हे दोघे बुधवार, 3 जानेवारी रोजी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. त्यानंतर ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या सोबतच पुष्पल यालाही मार लागला. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !