रावेर तालुक्यात नावेतून प्रवास करीत गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त

रावेर पोलिसांच्या कारवाईने अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ


Village kilns destroyed while traveling by boat in Raver taluka रावेर : हतनूर धरणाच्या बॅकवाटरमध्ये नावेतून जाऊन रावेर पोलिसांनी तापी नदी काठावरील रावेर तालुक्यातील थेरोळे शिवारातील गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. 230 लीटर गावठी हातभट्टीची दारूसह 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र आरोपी पोलिसांना पाहताच पसार झाले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
थेरोळा शिवारात गावठी हात भट्टीव्दारे दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, हवालदार अर्जुन सोनवणे, राहुल परदेशी, चैतन्य नारखेडे आदींच्या पथकाने तापी नदीच्या काठावर असलेल्या दोन ठिकाणी असलेल्या हात भट्टीवर धाड टाकून या हातभट्टी उद्धवस्त केल्या. पोलीस दिसताच आरोपी मात्र पसार झाले. याबाबत आरोपी भीमराव बंन्सी अटकाळे, भीमराव गंभीर अटकाळे, सुपडू गंभीर अटकाळे (थेरोळा, ता.रावेर) यांच्याविरूद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अर्जुन सोनवणे, नितीन आमोदकर करीत आहेत.



47 हजारांचा मुद्देमाल जप्त
या धाडीत हात भट्टीवरील 11 हजार 500 रुपये किंमतीची 230 लीटर गावठी हात भट्टीची दारू, आठ हजारांचे चार हजार लीटर गुळमोह मिश्रीत उकळते पक्के रसायन, 28 हजारांचे 400 लीटर कच्चे रसायन गुळ मोह मिश्रीत प्लॅस्टीकच्या ड्रममधील रसायन असा एकूण 47 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल माल मिळून आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !