किनगावात स्पेअर पार्टचे दुकान फोडले : 70 हजारांचा मुद्देमाल लंपास
A spare part shop was broken into in Kingaon : 70,000 worth of goods were looted यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथे अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावरील तेजस अरुण वारे-पाटील यांच्या आई जगदंब ऑटो स्पेअर पार्ट विक्रीचे दुकानात चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
चोरीने किनगावात खळबळ
या दुकानात त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्पेअर पार्ट, ऑईलसह विविध साहित्य ठेवले होते. बुधवारी पहाटे पूर्वी त्यांच्या दुकानाचा मागील बाजूसचा पत्रा उचकून अज्ञात चोरट्याने दुकान प्रवेश केला आणि दुकानातून सर्वो कंपनीचे ऑईल तसेच विविध प्रकारचे स्पेअर पार्ट असा एकूण 70 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तेजस वारे-पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.

