कुर्‍ह्यानजीक 12 लाखांची लूट : आरोपी पोलिसांच्या रडारवर


12 lakh loot near Kura : Accused on police radar भुसावळ : जामनेर येथील ऑईल कंपनी मालकाला 11 लाख 77 हजार रुपयांची रोकड देण्यासाठी निघालेल्या मॅनेजरला पिस्टल दाखवत मांडवेदिगरनजीक लूटण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रस्ता लूट झाली त्या काळातील सीसीटिव्ही फुटेज मिळविले असून संशयीत पोलिसांच्या नजरेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असे आहे लूट प्रकरण
नशिराबाद येथून जामनेरकडे 11 लाख 77 हजार 742 रुपयांची रोकड घेऊन जात असलेले भीमराव तायडे यांची दुचाकी बुधवारी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अडवण्यात आली होती. त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळील 11 लाख 77 हजार 742 रूपये असलेली बॅग घेऊन चोरटे हे जामनेरकडे पळाले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या भागातील सर्वच सीसीटिव्ही फुटेज जमा केले आहे. पोलिसांना मोटर सायकल व संशयीतांचे फुटेज मिळाले आहे. त्या आधारावर पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. पोलिसांकडून नशिराबादपासून ते घटना घडली त्या मार्गापर्यतच्या विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या खासगी सीसीटिव्ही कॅमेर्‍याचे फुटेज जमविले आहे. यामुळे चोरटे पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !