वरणगाव पोलीस ठाण्यात कर्मचार्याला शिविगाळ : तिघांविरोधात गुन्हा
Abusing an employee in Varangaon police station : A case against three भुसावळ : वरणगाव पोलीस ठाण्यात कर्तव्यावरील कर्मचार्यालाच शिविगाळ कररून शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. ही घटना शनिवार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी रात्री 11 वाजता तीन जणांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे प्रकरण
वरणगाव पोलीस ठाण्यात शनिवार, 6 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी योगेश पाटील हे कर्तवयावर असताना भुसावळ तालुक्यातील फुलगावातील महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती काशीनाथ पाटील हे पोलीस ठाण्यात आले. पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी राहुल पाटील यांना विचारपूस केल्यानंतर त्यांना राग आल्याने तिघांनी पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांना शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर शासकीय कामात अडथळा निर्माण करत धमकी दिली.


हा प्रकार घडल्यानंतर रात्री 11 वाजता पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून महेंद्र काशीनाथ पाटील, राहुल काशीनाथ पाटील आणि ज्योती महेंद्र पाटील (तिघे रा.फुलगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.