नांदुरा भागातील मतदारांशी खासदार रक्षा खडसेंनी साधला संवाद
रणरणत्या उन्हातही प्रचार : भाजपाला मतदान करण्याचे केले आवाहन
MP Raksha Khadse interacted with the voters of Nandura area नांदुरा : रावेर लोकसभेतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी बुधवारी नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड आदी भागात प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटी घेत त्यांच्याशी हितगुज साधले. यावेळी नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विविध भागात पदाधिकार्यांसह मतदारांच्या गाठी-भेटी
रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी माजी आमदार चैनसुख संचेती व नांदुरा तालुक्यातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे आदी मित्र पक्षाच्या पदाधिकार्यांसह नांदुरा तालुक्यातील मौजे तांदुलवाडी, शेंबा, टाकरखेड, बेलुरा खैरा, महाळुंगी, माळेगांव गोंड आदी गावात प्रचार दौरा केला. रणरणत्या उन्हातही मतदारांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले तर ठिकठिकाणी सुवासिनींनी त्यांचे औक्षण करीत आशीर्वाद दिले. अनेक वयोवृद्धांनी खासदार रक्षा ताईंशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या प्रकृतीची ताईंनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली.






