पुणे ते अयोध्या कँट उन्हाळी विशेष गाडीच्या कालावधीत वाढ
भुसावळ : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेतर्फे पुणे ते अयोध्या कँट विशेष गाडी चालविण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा
रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याने प्रवाशांना बसण्यास जागा मिळत नाही. यामुळे रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते अयोध्या कँट उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा कालावधीत वाढ केली आहे. गाडी 01455 पुणे ते अयोध्या कँट द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 31 मे पर्यंत चालविण्यात येणार आहे तर गाडी 01456 अयोध्या कँट ते पुणे द्वि -साप्ताहिक विशेष गाडी 2 जूनपर्यंत चालविली जाणार आहे. वरील विशेष गाड्यांच्या वेळ, थांबा आणि रचना यात कोणताही बदल नाही. प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

