भरधाव बस कारवर आदळली : नाशिकच्या एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू


नाशिक : जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे भावाकडे वास्तू शांतीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या एकाच कुटूंबातील तिघांचा कार अपघातात मृत्यू झाला. नांदगावजवळ भरधाव बस कारवर आदळल्याने अपघात झाला. आई आणि भाऊ-बहिण या अपघातात मृत्यूमुखी पडले तर तीन वर्षीय नातू मात्र बचावला. वंदना संतोष ललवाडे (40), शुभम संतोष ललवाडे (20), निकिता मनोज शिंदे (22) अशी मयतांची नावे आहेत.

भडगावकडे येताना अपघात
वंदना ललवाडे या आपला भाऊ विश्वनाथ फकिरा पाटील यांच्याकडे वास्तुशांती असल्याने आपला मुलगा शुभम आणि विवाहित मुलगी निकीता आणि तीन वर्षीय नातू यांच्यासह कार (एम.एच.15 सी.डी.2057) ने भडगावकडे येत असताना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी गावाजवळील हॉटेल तेजस नजिक समोरील एका वाहनाला ओव्हरटेक करणारी चाळीसगाव -मनमाड बस (एम.एच.14 बी.टी. 4498) ललवाडे यांच्या कारवार आदळली. बसने कारला समोरून दिलेल्या धडकेने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. त्यास मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !