अंदमानमध्ये मान्सून धडकला : महाराष्ट्रात या तारखेला बरसणार !


नागपूर : वाढत्या उकाड्याने त्रस्त नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानमध्ये पोहोचला असून 31 मे रोजी तो केरळमध्ये दाखल होणार आहे शिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. कडक उन्हापासून आणि उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा करीत आहेत. ंदमान आणि निकोबार बेटांवर यंदा मान्सून लवकर येईल, असे हवामान खात्याने सांगितले होते.

ट्विटद्वारे दिली माहिती
मान्सूनबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विट केले. 19 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. प्रत्येक वेळी मान्सून 22 मे पर्यंत अंदमानात दाखल होतो मात्र यंदा ते तीन दिवस आधी म्हणजेच 19 मे रोजी पोहोचला. नंतर मान्सूनचे आगमन होताच अंदमानमध्ये पावसाला सुरुवात झाली.



दहा दिवसांत केरळमध्ये धडकणार मान्सुन
अंदमान निकोबारमध्ये मान्सूनच्या प्रवेशानंतर आता त्याची वाटचाल केरळच्या दिशेने सुरू होणार आहे. अंदमानातून येणारे मोसमी वारे केरळपर्यंत पोहोचायला दहा दिवस लागतात. मान्सूनचा हाच कल असाच सुरू राहिल्यास 31 मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकलमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडेल. या राज्यांमध्ये 19 आणि 20 मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल
31 मे रोजी केरळमध्ये धडकल्यानंतर मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून साधारणपणे जूनच्या मध्यात महाराष्ट्र आणि विदर्भात पोहोचतो. मात्र वावेळी मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या काही दिवस आधी दाखल होऊ शकतो.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !