प्रतीक्षा संपली : बारावी परीक्षेचा उद्या निकाल !
पुणे : बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी गोड बातमी आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होत आहे. ‘सीबीएसई’ बोर्डाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील बारावीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर राज्य मंडळाच्या सचिवा अनुराधा ओक यांनी सोमवारी एका परिपत्रकाराद्वारे हा निकाल मंगळवार, 21 दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले.
5 जूनपर्यंत अर्ज करता येणार
मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 5 जूनपर्यंत गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुभा असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात 12 वीच्या परीक्षांचे आयोजन केले होते. राज्यभरातील बारावीच्या 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.


निकाल कुठे व कसा पाहता येईल?
mahahsscboard.in
mahresult.nic.in
results.gov.in
hscresult.mkcl.org
result.digilocker.gov.in