राजकोटमध्ये गेम झोनमध्ये आग : 20 जणांचा मृत्यू


Game zone fire in Rajkot : 20 dead सुरत : गुजरातच्या राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत 20 जणांचा मृत्यू ओढवल्याने खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन खाक झाला असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आग विझल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दहा जणांना वाचवण्यात यश
राजकोटमधील टीआरपी गेमिंग झोनमध्ये आग लागल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले तर आणखी आकडा वाढण्याची भीती आहे. शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राजकोट पोलीस आयुक्तांनी दिलया आहेत. आगीत 10 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. या आगीत संपूर्ण गेम झोन जळून खाक झालाय. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे देखील अवघड आहे. आगीचे कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.



दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार, गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !