भुसावळात क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जंगी स्वागत

राज्यासह देशासाठी काम करणार : सत्कारप्रसंगी राज्यमंत्र्यांची ग्वाही


भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात खान्देशातून एकमेव रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांची वर्णी लागली. मंत्री पदाच्या शपथविधीनंतर खासदार खडसे यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाचे खाते मिळाल्यानंतर त्या शनिवार, 15 जून रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर आल्या. भुसावळात पहाटे डाऊन हावडा मेलने त्यांचे आगमन झाल्यानंतर पदाधिकार्‍यांनी ढोल-ताशांच्या गजरात मंत्री खडसे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मंत्री खडसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन केले.

पदाधिकार्‍यांचा जल्लोष
शनिवारी पहाटे खासदार व मंत्री खडसेंचे रेल्वेने आगमन झाल्यानंतर पदाधिकार्‍यांनी रेल्वे स्थानकावर जल्लोष केला. यावेळी ढोल-ताशांचा गजर करीत मंत्री खडसेंच्या व भाजपाच्या विजयाच्या पदाधिकार्‍यांनी घोषणा देत पदाधिकारी थिरकले. भुसावळच नव्हे तर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते. सत्कारानंतर मंत्री खडसे या कारने जामनेर रोड, नाहाटा चौफुलीमार्गे मुक्ताईनगरकडे रवाना झाले.



यांची होती उपस्थिती
सत्कार प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष युवराज लोणारी, यावलचे डॉ.कुंदन फेगडे, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, राकेश पाटील, भरत महाजन, उमेश फेगडे, भालचंद्र पाटील, ग्रामीण मंडळ अध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, श्रेयस इंगळे, माजी नगरसेवक प्रमोद नेमाडे, किरण कोलते, अ‍ॅड.बोधराज चौधरी, जयंत माहुरकर, राहुल तायडे, प्रशांत निकम, नीळकंठ भारंबे, सदानंद उन्हाळे, चंद्रशेखर अग्रवाल, अनिरुद्ध कुळकर्णी, शंकर शेळके, विशाल जंगले, प्रशांत नरवाडे, प्रमोद पाटील, नंदकिशोर बडगुजर, सचिन येवले, निलेश इंगळे, गणेश धनगर, गोलू पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष अनिता आंबेकर, अलका शेळके, मनीषा पाटील, प्रीती पाटील, वंदना उन्हाळे, सागर अग्रवाल, दर्शन चिंचोले, चेतन जैन, सागर जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यासह देशासाठी काम करणार : रक्षा खडसे
मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, मतदारसंघासह राज्य व देशासाठी काम करावयाचे आहे. मंत्री पद मिळाल्याचा आनंद आहे मात्र मंत्री झाले यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. मी खासदार म्हणून काम पहिले आहे. यावेळी देखील मला तशी कोणतीही अपेक्षा नव्हती. परंतु पक्ष, पंतप्रधान मोदी व जनतेच्या आशीर्वादाने मला मंत्री पद मिळाले आहे. लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मागील तीन दिवसांत खात्याचा आढावा घेतला. देशात चांगले खेळाडू पुढे येत आहेत. ऑलम्पिकमध्ये चांगले मेडल खेळाडू आणत आहेत त्यांना आपण प्रोत्साहन देणार असल्याच्या त्या म्हणाल्या.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !