अश्लील व्हिडिओ व्हायरलची धमकी : माजी आमदाराकडे मागितली एक कोटींची खंडणी
अहमदनगर : बीडचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांच्याकडे तब्बल एक कोटींच्या खंडणीची मागणी आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार जानेवारी ते 26 जून दरम्यान हॉटेल रॉयलमध्ये घडला. नगरमधील एका महिलेसह तिघां विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितली.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी गायकवाड व बांगर (पूर्ण नाव माहित नाही ) या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर (रा.अहमदनगर) अशा तीन जणांवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भीमराव माजी आमदार भीमराव धोंडे यांनी तक्रार दिली.

25 हजार रुपये स्वीकारले
तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे असून ती सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करू तसेच अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करू मात्र तसे करायचे नसेल तर एक कोटी रुपये लागतील, असे सांगून धमकावण्यात आले. यातील 25 हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
