पंढरपूर आषाढी एकादशीसाठी भुसावळ-पंढरपूरसह पाच विशेष रेल्वे गाड्या धावणार !
भुसावळ : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणार्या वारकर्यांची गर्दी लक्षात घेता रेल्वेतर्फे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपूर-मिरज, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर आदी ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे.
नागपूर-मिरज स्पेशल
गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी नागपूर येथून दिनांक 14. जुलै रोजी सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरजला पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक 01206 विशेष गाडी मिरज येथून दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असतील.

नागपूर-मिरज विशेष गाडी
गाडी क्रमांक 01207 विशेष गाडी नागपूरहूर 15 जुले रोजी सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी आठवाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01208 मिरज येथून 19 जुलै रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूरला पोहोचणार आहे. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, 14 शयनयान यासह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असतील.
नवी अमरावती-पंढरपूर
गाडी क्रमांक 01119 विशेष गाडी नवी अमरावती येथून 13 जुलै आणि 16 रोजी 2.40 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01120 पंढरपूर येथून 14 जुलै आणि 17 जुलै रोजी 7.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 12.40 वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असेल.
खामगाव-पंढरपूर
गाडी क्रमांक 01121 विशेष गाडी खामगाव येथून 14 व 17 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 3.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01122 विशेष गाडी पंढरपूर येथून 15 व 18 रोजी पाच वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 7.30 वाजता खामगावला पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, सात शयनयान, सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन असतील.
भुसावळ-पंढरपूर
गाडी क्रमांक 01159 विशेष गाडी भुसावळ येथून 16 रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 3.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01160 विशेष गाडी पंढरपूर येथून 17 जुलै रोजी 10.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी एक वाजता भुसावळ स्थानकावर पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला पाच शयनयान, 11 जनरल सेकंड क्लाससह दोन लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन. असतील. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.