महिला पोलीस अधिकार्‍याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न


पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मद्यधूंद कार चालकाने चक्क महिला पोलीस अधिकार्‍याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी रात्री आठ वाजता विश्रामबाग हद्दीतील फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनसमोर ही घटना घडली.

कारवाई करताना धक्कादायक घटना
पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणार्‍या विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुरू असताना कारमधील चालक संजय फकिरा साळवे हा मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी महिला अधिकारी आणि कार चालकात वाद झाला. चालकानं अधिकार्‍याला पेट्रोल ओतून जाळण्याची धमकी दिली. जवळच पेट्रोल पंप होता. चालक संजय फकिरा साळवेनं पोलिसावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातात लायटर होतेे मात्र तो नशेत असल्याने त्याच्या लक्षात ही बाब न आणल्याने अनर्थ टळला. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !